नांदूरशिंगोटे परिसरात पॅनल निर्मितीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:55 PM2020-12-25T17:55:36+5:302020-12-25T17:56:04+5:30

नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्यामुळे गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे परिसरातील गावांमध्ये गटा-तटाच्या बैठका सुरु झाल्या असून पॅनल निर्मितीला वेग आला आहे. दरम्यान, इच्छूक उमेदवार पॅनलकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

Accelerate panel formation in Nandurshingote area | नांदूरशिंगोटे परिसरात पॅनल निर्मितीला वेग

नांदूरशिंगोटे परिसरात पॅनल निर्मितीला वेग

Next

नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने या भागात राजकीय वातावरण तापू लागले आहेत. परिसरातील दोडी बुद्रुक, भोजापूर खोरे परिसर, दापूर, दातली, मानोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ आदी मोठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यामुळे पॅनल निर्मितीला वेग आला आहे. भाऊबंदकी व वाड्यावाड्यातून कोणी उमेदवारी करायची याबाबत गटागटात बैठका सुरु झाल्या आहेत. इच्छूक उमेदवारांची कागदपत्रांसाठी धावपळ सुरु असून अनेक उमेदवार ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणक केंद्रावर गर्दी करताना दिसून येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवस सुट्टी असल्याने शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. दोडी, दापूर, चास, नळवाडी, खंबाळे, निऱ्हाळे आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Accelerate panel formation in Nandurshingote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.