अभाविपचे प्रतिभा संगम संमेलन
By Admin | Updated: September 23, 2016 01:01 IST2016-09-23T01:01:02+5:302016-09-23T01:01:13+5:30
आजपासून आयोजन : महाकवी कर्डकनगरात विद्यार्थी साहित्य जागर

अभाविपचे प्रतिभा संगम संमेलन
नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे १५वे प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन दि.२३ ते २५ रोजी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात या सभागृहात होणार आहे . या संमेलनाचे उद््घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नीलिमा पवार यांनी दिली.
पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना पवार यांनी सांगितले की, शुक्र वार (दि.२३) सायं.५.३० वाजता विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होईल. तत्पूर्वी सायंकाळी ४ वाजता सावानाचे मिलिंद जहागिरदार यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीस कुसुमाग्रज निवासस्थान येथून शुभारंभ होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले आहे. तसेच शनिवार (दि.२४ ) सकाळी ९ वाजता साहित्यिक अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत, दुपारी ३ वाजता कथाकथन व अभिवाचन, सायंकाळी ५ वाजता मुक्तसंवाद तसेच रात्री ८.३० वाजता निवडक विद्यार्थी साहित्यिकांचे कवी संमेलन होणार आहे. रविवार (दि.२५) सकाळी ९ वाजता भाषा और साहित्य या विषयावर प्रा. डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांचे व्याख्यान होईल. स. १०.३० वाजता लेखन, स्वातंत्र्य, मर्यादा भान या विषयावर परिचर्चा होईल. दु. २.३० वाजता ‘साहित्यिकांचा आविष्कार’ या विषयावर गायक नंदेश उमप यांचे व्याख्यान आहे. सायंकाळी ४ वाजता समारोप व पारितोषिक वितरण अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या हस्ते तसेच वक्ते प्रा. प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होईल .
प्रदर्शनी कक्षाला नाशिकचे सुपुत्र स्व. मुरलीधर खैरनार यांचे नाव देण्यात आले आहे. व्यासपीठाला निसर्ग कवी स्व.नीलेश पाटील नाव देण्यात आले आहे. या संमेलनात
साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे कार्याध्यक्ष महेश दाबक व सचिव दिनेश रणदिवे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. प्रशांत टोपे व अमोल अहिरे,योगेश मालपुरे, खलील मोमिन, प्रवीण काळोखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)