अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST2021-05-13T04:15:46+5:302021-05-13T04:15:46+5:30
आगरटाकळी येथील एक अल्पवयीन मुलगी चार दिवसांपूर्वी मामाच्या घरी गेली असता चुलत मामाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास ‘तू ...

अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार
आगरटाकळी येथील एक अल्पवयीन मुलगी चार दिवसांपूर्वी मामाच्या घरी गेली असता चुलत मामाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास ‘तू गावात आली मला भेटली नाही, तू माझ्या सोबत चल...’ असे म्हणत फूस लावून भाचीचा हात धरून तोंड दाबून बळजबरीने घरामागील मळ्यातील जुन्या घरात नेले. तेथे जबरदस्ती करू लागला. भाचीने विरोध केला असता संशयिताने मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास तिला सोबत घेत दुचाकीवरून लाखलगाव पेट्रोलपंपावर चक्कर मारून पुन्हा एकलहरेजवळील गावात आणून नव्या घरी सोडले. तेथे पुन्हा संशयित रवींद्र याने दमदाटी देत बळजबरीने मुलीवर अत्याचार करुन घराला बाहेरून कुलूप लावून जुन्या घरी गेला. अल्पवयीन भाचीच्या मोबाइलमध्ये बॅलन्स नसल्याने तिला कोणाला फोन करता आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने फोन केल्यावर पीडित मुलीने घडलेली घटना सांगितली. मुलीची आजी-आई, मामा यांनी लागलीच रवींद्रच्या घरी येऊन दरवाजाचे कुलूप तोडून मुलीची सुटका केली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित रविंद्रच्या विरुध्द बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.