निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:13 IST2021-04-06T04:13:42+5:302021-04-06T04:13:42+5:30

पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महेश मधुकर पाटील (२०, रा. शिवाजीनगर) याने पीडितेसोबत मैत्री करुन संपर्क ...

Abuse of a minor girl in a secluded place | निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महेश मधुकर पाटील (२०, रा. शिवाजीनगर) याने पीडितेसोबत मैत्री करुन संपर्क वाढविला आणि एकतर्फी प्रेमाचा बनाव करून संशयित महेश याने जवळीक निर्माण केली. तिच्या इच्छेविरुद्ध तिला गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोदावरीच्या काठावरील गोदा पार्क भागात निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे संशयिताने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पीडितेची संशयितास भेटण्याची इच्छा नसताना तिच्या घरासमोर येऊन, फोन करून तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत तिने म्हटले आहे. याप्रकरणी संशयित महेशविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी (दि. ४) सायंकाळी त्यास अटक केली आहे.

Web Title: Abuse of a minor girl in a secluded place