अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST2021-07-20T04:11:48+5:302021-07-20T04:11:48+5:30

आंघोळ करणाऱ्या महिलांचे काढले व्हिडिओ नाशिक : दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक भागात एका ३५ वर्षीय ...

Abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आंघोळ करणाऱ्या महिलांचे काढले व्हिडिओ

नाशिक : दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक भागात एका ३५ वर्षीय वासनांध संशयिताने दोन महिलांचे चोरट्या पध्दतीने लपून बाथरूममध्ये त्या आंघोळ करत असताना मोबाइलद्वारे व्हिडिओशूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित इमरान भुसारीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

----

कामगाराचा इमारतीवरून कोसळून मृत्यू

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील किरण टेक्नो क्लास या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आनंद तिरप्पा अप्पा (४०, रा. घरकुल प्रकल्प, चुंचाळे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. आनंद कोसळून गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच अन्य कामगारांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डोक्याला गंभीर मार लागून झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Abuse of a minor girl