शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:09 IST

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव नाशिककरांना अडचणीचा20 वर्षांपासून चर खोदण्याचे काम रखडलेचेहेडी बंधाऱ्याचा प्रश्न कायम

संजय पाठक, नाशिक : अखेर नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला असून उद्या पासून चार विभागात एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे तर दर गुरुवारी कोरडा दिन पाळला जाणार आहे. नाशिक शहरासाठी पाण्याची कमी नाही तब्बल पाच धरणातून पाणी उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर आताही धरणात सुमारे तीनशे दश लक्ष घन फूट पाणी साठाही शिल्लक आहे परंतु तरीही नाशिककरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले. गंगापूर धरणाची क्षमता कमी होऊन ती 5600 दश लक्ष घन फूट इतकी झाली असली तरी कश्यपी आणि गौतमी गोदावरी या धरणातून अतिरीक्त 3600 दश लक्ष घन फूट पाणी उपलब्ध झाले मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेने 1999 मध्ये गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण केली. त्यावेळी धरणाच्या हेड वर्क म्हणजे शिरो भागाचे काम करताना जलविहिरीच्या पुढे धरणातील निच्चांकी पातळीचे पाणी घेण्यासाठी चर खोदण्याचे एक काम अंतर्भुत होते तेच केले गेले नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे काम होऊ शकले नाही त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा महापालिकेच्या जलविहिरीत पाणी येत नाही आणि अडचण होते आज कश्यपी धरणात 90 आणि गौतमी धरणात 60 दश लक्ष घन फूट पाणी गंगापूर धरणातील साठ्या शिवाय शिल्लक आहे पण ते धरणात आले तरी चर नसल्याने हे पाणी मनपाच्या जल विहिरीत येऊ शकत नाही.असाच प्रकार चेहेडी बंधाऱ्याच्या बाबतीत आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड विभागातील बहुतांशी भागात दारणा धरणातील पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी चेहेडी बंधाऱ्यातून उचलले जाते. पण बंधाऱ्याच्या अलिकडे भगूर आणि देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे मलजल सोडले जाते त्यामुळे येथून उचलले पाणी अत्यंत दूषित असल्याने मे आणि जून महिन्यात किमान 20  ते 25 दिवस येथून पाणी उचलता येत नाही. आज दारणा धरणात महापालिकेच्या हक्काचे 150 दश लक्ष घन फूट पाणी असूनही देखील ते मिळणे दुरापास्त आहे. ही समस्याही जुनीच आहे पण मलजल येते त्याच्या पलीकडे नवीन बंधारा बांधणे किंवा तेथे पाईपलाईन टाकून थेट शुद्धीकरण केंद्रा पर्यंत पाणी आणणे महापालिकेला आजवर शक्य झालेले नाही याच समस्यांमुळे आज नाशिककरांना धरणात पाणी असूनही कपातीला सामोरे जावे लागत आहे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाRanjana Bhansiरंजना भानसीgangapur damगंगापूर धरण