फरार डॉक्टर पती पोलिसांना शरण
By Admin | Updated: April 4, 2017 00:48 IST2017-04-04T00:48:43+5:302017-04-04T00:48:58+5:30
सटाणा : मुल्हेर येथील नवविवाहिता अश्विनी क्षीरसागर हिच्या आत्महत्त्या प्रकरणी फरार डॉक्टर पती मनोज क्षीरसागर जायखेडा पोलिसांना शरण आला आहे.

फरार डॉक्टर पती पोलिसांना शरण
सटाणा : मुल्हेर येथील विवाहितेची आत्महत्त्यासटाणा : मुल्हेर (ता. बागलाण) येथील नवविवाहिता अश्विनी क्षीरसागर हिच्या आत्महत्त्या प्रकरणी फरार डॉक्टर पती मनोज क्षीरसागर जायखेडा पोलिसांना शरण आला आहे. न्यायालयाने त्याला पंधरा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अंतापूर येथील माहेरवाशीण व मुल्हेर येथील सासर असलेल्या अश्विनी मनोज क्षीरसागर (२०) हिने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी सासरच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. मात्र उच्च न्यायालयाने जमीन फेटाळल्याने डॉ. मनोज जायखेडा पोलिसांना शरण आला. जायखेडा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवले होते.
पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी पोलिसांनी सटाणा न्यायालयापुढे उभे केले असता पंधरा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करत आहेत. (वार्ताहर)