ग्रोधा प्रकरणातील फरार संशयित मालेगावातून जेरबंद
By Admin | Updated: July 14, 2016 01:34 IST2016-07-14T01:33:30+5:302016-07-14T01:34:36+5:30
ग्रोधा प्रकरणातील फरार संशयित मालेगावातून जेरबंद

ग्रोधा प्रकरणातील फरार संशयित मालेगावातून जेरबंद
मालेगाव : गुजरात राज्यातील ग्रोधा प्रकरणात फरार संशयिताला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गोध्रा प्रकरणी २००२ पासून पोलिसांना हवा असलेला संशयित इमरान अहमद शेख ऊर्फ शेरू ऊर्फ बटूकला पकडण्यासाठी अहमदाबाद सत्र न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. पोलीस पथकाने आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संशयितास ताब्यात घेत गुजरात येथे रवाना केले.