शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! अहो, कोथिंबिरीची एक जुडी चक्क ३३१ रूपयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 21:22 IST

गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे.

ठळक मुद्देपावसाने दडी मारली कोथिंबिरीचे बाजारभाव गगनाला

संदीप झिरवाळ, नाशिक : कोथिंबिरीची एक जुडी आतापर्यंत आपण १५, २०, २५ खूप झाले तर ५० रूपयांपर्यंत खरेदी केली असाल; मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि.१६) कोथिंबिरची एक जुडी चक्क ३३१ रूपयांपर्यंत पोहचली. ३३ हजार १०० रूपये शेकडा याप्रमाणे लिलावाचा भाव फुटला. कोथिंबिरचा स्वाद घेणे महाग झाले असून पावसाने दडी मारल्याचा थेट परिणाम आवकवर झाला आहे.गेल्या महिनाभरापासून कोथिंबिरसह अन्य शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे. मंगळवारी सायंकाळी बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिर शेतमालाला ३३ हजार १०० रु पये शेकडा असा हंगामातील व बाजारसमितीच्या इतिहासातील सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव मिळाला.काही वर्षांपूर्वी आडत सुरू असताना कोथिंबीर २७ हजार रु पये शेकडा प्रति दराने विक्र ी झाली होती. मंगळवारी कोथंबीर जुडीला ३३१ रु पये असा इतिहासातील उच्चांकी तीन आकडी बाजारभाव मिळाला असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.कळवण तालुक्यातील औत्यपाणी येथील शेतकरी काशिनाथ बाळु कामडी यांनी विक्र ीसाठी आणलेल्या कोथिंबिरीच्या प्रति जुडीला ३३१ रु पये असा बाजारभाव मिळाला. नाशिक बाजारसमितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. कामडी यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबिर शेतमाल विक्र ीसाठी आणला होता.गेल्या काही दिवसांपासून कोथंबीर प्रति जुडीला शंभर, दीडशे, दोनशे, सव्वा दोनशे ते थेट अडीचशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे. भाव वाढत चालल्याने ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रूपये मोजावी लागत आहे. सध्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर गायब झाली आहे. पावसाचे काही तालुक्यांत उशिराने आगमन झाले; मात्र पुन्हा आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे तर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेला कोथंबीर माल दत्तू अपसूंदे या व्यापाºयाने खरेदी केला तर अन्य व्हेजिटेबल कंपनीत कोथंबीर दोनशे, सव्वा दोनशे, अडीचशे, तीनशे रु पये प्रति जुडी दराने विक्र ी झाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत देखील ३३० रु पये प्रति जुडी दराने कोथंबीर, ६० रु पये जुडी मेथी तर ४५रूपये शेपू जुडी विक्र ी झाली असे राजू भोरे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीMarketबाजारvegetableभाज्या