मालेगावी सुमारे साडेचार किलो गांजा जप्त

By Admin | Updated: November 1, 2015 22:30 IST2015-11-01T22:27:12+5:302015-11-01T22:30:05+5:30

मालेगावी सुमारे साडेचार किलो गांजा जप्त

About half a kg of mangoes in Malegaon were seized | मालेगावी सुमारे साडेचार किलो गांजा जप्त

मालेगावी सुमारे साडेचार किलो गांजा जप्त

मालेगाव : येथील आयशानगर पोलिसांनी रविवारी सकाळी नवीन बसस्थानक परिसरातून चार किलो ६२० ग्रॅम वजनाच्या गांजासह दोघांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र बाबूराव कोळी यांनी आयशानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
येथील नवीन बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर शेख जाकीर शेख मजीद (रा. इदगानगर, सिल्लोड), रंगनाथ सुपडू सोनवणे (रा. म्हसोबा गल्ली, सिल्लोड) व जाकीर नैउद्दीन मन्सुरी पठाण (रा. गोल्डननगर, मालेगाव) या तिघांजवळ विनापरवाना बेकायदा काळ्या रंगाच्या पिशवीत चार किलो ६२० ग्रॅम वजनाचा चार हजार ६०० रुपये किमतीचा गांजा मिळून आला. हा गांजा बाजारात विक्री करण्यासाठी आणण्यात आला होता. या प्रकरणी आयशानगर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगनाथ व जाकीर यांना अटक करण्यात आली असून, जाकीर शेख पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. जमादार संजय सोनवणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: About half a kg of mangoes in Malegaon were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.