कंटेनरसह सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: May 4, 2015 01:40 IST2015-05-04T01:39:14+5:302015-05-04T01:40:07+5:30

कंटेनरसह सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

About 77 lakhs worth of containers seized | कंटेनरसह सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कंटेनरसह सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : महाराष्ट्र शासनाचा महसूल चुकवून हरियाणा राज्यात तयार करण्यात आलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि़ ३० एप्रिल) नाशिक - मुंबई महामार्गावरील सोनाळेगावाजवळील आदित्य कंपनीसमोर पकडला़ या कंटेनरसह सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ हरियाणा व महाराष्ट्र शासनाचा महसूल चकवून हरियाणा राज्यात तयार करण्यात आलेले मद्याची चोरटी वाहतूक करणारा कंटेनर (एचआर ६३ बी ५३९०) नाशिक-मुंबई महामार्गावरून जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली़ त्यानुसार सोनाळेगावाजवळ आदित्य कंपनीच्यासमोर हा कंटेनर अडविण्यात आला़ या कंटेनरमध्ये बेल्डेस स्प्राईट, व्हिस्की, ग्रेन प्लेन व्हिस्की, मॅजिक मुमेंट व्होडका, एव्हरीडे गोल्ड व्हिस्की, विविध ब्रँड असणारी व्हिस्की तसेच रॉयल स्टॅग व्हीस्की, हायवर्ड ५००० बिअर अशी विविध ब्रॅण्डचे एकूण ९८५ बॉक्समध्ये विदेशी मद्य व बिअर मिळून आली़ या मद्याची अंदाजे किंमत ३२ लाख ३२ हजार ४०० रुपये व दारू वाहतुकीसाठी वापरलेले कंटेनरची किंमत ४५ लाख असा एकूण ७७ लाख ३२ हजार ४०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे़ या प्रकरणी वाहनचालक भूषण बलवंतसिंग (वय ३२, रा़ पंजाब) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्यामसुंदर शिंदे, संचालक प्रशांत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मुकुंद बिलोलीकर, सुभाष जाधव, दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे, शंकर आंबेकर, राजेश सकपाळ, जवान धनंजय भदरगे, सलीम शेख, हिपकर यांनी ही कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: About 77 lakhs worth of containers seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.