सुरगाणा येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात

By Admin | Updated: August 11, 2014 00:53 IST2014-08-10T23:01:21+5:302014-08-11T00:53:31+5:30

सुरगाणा येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात

Aboriginal Gaurav Day at Surgana | सुरगाणा येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात

सुरगाणा येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात

 

सुरगाणा : येथील पोलीस कवायत मैदानावर आदिवासी गौरव दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या मेळाव्यात अनुसूचित जातीमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाने सुरू केलेले आंदोलन आदिवासींवर घाला घालणारे असून, त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला.
आदिवासी गौरव दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचे आयोजन राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, ग्रामसेवक युनियन, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने केले होते. यावेळी मेळाव्याला आमदार ए. टी. पवार, माजी आमदार जे. पी. गावित, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, गोपाळराव धूम, इंद्रजित गावित, भिका राठोड, भिका राऊत, सखाराम भोये, आनंदा चौधरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आदिवासींनी पारंपरिक पोशाख करून आदिवासी नृत्य, लोकनृत्य, तुरनृत्य, पावरी नृत्य, डोंगऱ्या देव, खटखुबा, माहोळ नृत्य आदि नृत्यप्रकार सादर करीत लक्ष वेधून घेतले. आदिवासी कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. यावेळी प्रभाकर महाले, एन. एस. चौधरी, पांडुरंग पवार, बाळू चौधरी, मंगलदास गवळी, के. के. भोये, एस. के. चौधरी, भास्कर बागुल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Aboriginal Gaurav Day at Surgana