अभोणा ग्रामीण रु ग्णालयाला टाळे
By Admin | Updated: July 29, 2016 01:17 IST2016-07-29T01:09:08+5:302016-07-29T01:17:28+5:30
रिक्त पदे भरण्यासाठी आंदोलन : रु ग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप

अभोणा ग्रामीण रु ग्णालयाला टाळे
अभोणा : रुग्णाची गैरसोय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी अभोणा ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले.
अभोणा येथील ग्रामीण रुग्णालय हे आदिवासी भागातील गरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने रुग्णांची सेवा घडावी, यासाठी सुरू करण्यात आले. आठ वर्षापूर्वी रुग्णालयाची वास्तू बांधून त्याचे उद्घाटन करण्यात आले. परंतु आजपर्यंत सदर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. तसेच तीन वैद्यकीय अधिकारी असून त्यापैकी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. एक वैद्यकीय अधिकारी एका वर्षापासून व अन्य दोन महिन्यापासून उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेले आहेत. ते पददेखील रिक्त असून दोन सफाई कामगार, दोन परिचारिका व इतरही अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे अभोणा व परिसरातील आदिवासी खेड्यापाड्यावरून आलेल्या रुग्णाची योग्य ती तपासणी होत नाही. गरोदर मातांच्या वेळोवेळी होत असलेल्या तपासण्या व रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान होत तर नाहीच शिवाय गंभीर रुग्णावर इलाज करता येत नसल्याने त्यांना बाहेरगावी पाठविण्यात येते. अभोणा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील रुग्ण हे मोलमजुरी करून उदरिनर्वाह करणारे असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना रस्त्यावरच प्राण गमवावे लागले आहे. रुग्ण आणि सामान्य जनतेची हेळसांड होऊ नये, रिक्त व इतर पदे भरण्याबाबतचे आदेश व्हावेत व अभोणा व परिसरातील आदिवासी भागातील रु ग्णांना व जनतेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयास टाळे ठोकण्यात आले. याप्रसंगी राजू पाटील , विजय देसाई, भगवान पाटील, गिरीश देवरे, छावाचे मंगेश बर्गे, शेखर जोशी, संजय पाटील, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष कृष्णकांत कामळस्कर आदिसह शेकडो कार्यकर्ते व रु ग्ण उपस्थित होते.