शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

नाशकातील केटीएचएन महाविद्यालयात अभाविप छात्रभारती आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 17:53 IST

नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपवर जमावबंदीचे उल्लंघन करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करीत विरोध केल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली .

ठळक मुद्देनाशिकमध्ये अभिविप व छात्रभारती आमने-सामने सीएए , एनआरसी कायद्यावरून दोन गटात बाचाबाची महाविद्यालय प्रशासनाच्या मध्यस्थीतून परिस्थिती नियंत्रणात

नाशिक : देशभरात सीएए व एनआरसी कायद्यावरून विरोध व समर्थनार्थ आंदोलने आणि सभा सुरू असताना नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपवर जमावबंदीचे उल्लंघन करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करीत विरोध केल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. २३) अभाविपचे कार्यकर्ते सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना हा प्रकार घडला. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याविषयी अभाविपतर्फे विद्यार्थ्यांना माहिती देऊन सीएए, एनआरसी समर्थनार्थ त्यांच्या स्वाक्षºया घेण्यात येत असताना छात्रभारतीच्या काही कार्यकर्त्यांनी मोहीम थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला. तर शहरात जमावबंदी लागू असताना अभाविपने विनापरवानगी महाविद्यालयात घुसून सीएए व एनआरसी समर्थनाचे बॅनर झळकावत विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट समाजविरोधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन अभाविप व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने महाविद्यालयाच्या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, ही गोष्ट महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात येताच प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.  

केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत जरी पारीत केला असला तरी तो राज्यघटनेच्या मूळ उद्दिष्टांशी विसंगत आहे. भारतीय घटनेच्या १४व्या कलमानुसार जात, लिंग, वंश आणि धर्म या आधारे भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. या कायद्यामुळे केवळ नागरिकत्वच नव्हे, तर राज्यघटना आणि लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली आहेत. अभाविप स्वाक्षरी मोहीम राबवत असताना सदर बॅनरवर विशिष्ट धर्माचा उल्लेख केलेला असून, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जात-धर्माचा प्रचार करणे व विद्यार्थ्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.- समाधान बागुल, राज्य कार्यकारिणी सदस्य, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र 

सीएए, एनआरसी समर्थनार्थ स्वाक्षरी अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयांच्या कर्मचाºयांनीही  प्रतिसाद दिला. ही स्वाक्षरी मोहीम छात्रभारतीने हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. सीएए, एनआरसी कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. - अथर्व कुलकर्णी, महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय