अभिषेक कृष्णा आज पदभार स्वीकारणार

By Admin | Updated: July 8, 2016 00:38 IST2016-07-08T00:38:15+5:302016-07-08T00:38:37+5:30

अभिषेक कृष्णा आज पदभार स्वीकारणार

Abhishek Krishna will take charge today | अभिषेक कृष्णा आज पदभार स्वीकारणार

अभिषेक कृष्णा आज पदभार स्वीकारणार

नाशिक : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची मुबंई येथे विक्रीकर सहआयुक्तपदी बदली झाल्यानंतर नाशिकला बदलून आलेले नवे आयुक्त अभिषेक कृष्णा शुक्रवारी (दि. ८) पदभार स्वीकारणार आहेत.
अभिषेक कृष्णा हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत आहेत. गुरुवारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाल्यानंतर गेडाम यांनी तडकाफडकी पदभार सोडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. गेडाम यांनी सकाळी गोल्फ क्लबवरील रमजान ईदच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर काही वेळ ते कार्यालयातही आले. मात्र, दुपारी बदलीचे आदेश आल्यानंतर गेडाम यांनी सायंकाळी सर्व विभागप्रमुखांची बोलाविलेली बैठकही रद्द केली. गेडाम यांनी सायंकाळीच जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द करण्याची तयारी केली होती परंतु शुक्रवारी अभिषेक कृष्णा पदभार घेण्यासाठी येणार असल्याने केवळ रात्रीपुरता पदभार घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे समजते. दरम्यान, गेडाम यांनी शासनाच्या निर्णयानुसार आपण शुक्रवारी सकाळी नवे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडे कार्यभार सोपविणार असल्याचे सांगितले आणि कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Abhishek Krishna will take charge today