अभिनव शाळेत फटाकेविरहित दिवाळीचा संकल्प
By Admin | Updated: October 23, 2016 23:32 IST2016-10-23T23:31:50+5:302016-10-23T23:32:21+5:30
अभिनव शाळेत फटाकेविरहित दिवाळीचा संकल्प

अभिनव शाळेत फटाकेविरहित दिवाळीचा संकल्प
येवला : शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अभिनव बालविकास मंदिरात दीपावलीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे आकर्षक भेटकार्ड तयार करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार करून वर्ग सजावट केली. याप्रसंगी मुख्याध्यापक सुदर्शन जाधव यांनी विद्यार्थ्यांना दीपावली सणाविषयी माहिती सांगून ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण टाळण्यासाठी फटाक्याविना व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनीही फटाके विरिहत दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी शकीला पटेल, गिरिशा भामरे, संगीता राव, वाल्मीक जाधव, हंसाबाई परदेशी, जयश्री देशमुख, बाळू गोरे, सीमा जाधव, रूपाली गायकवाड आदिंसह पालक उपस्थित होते. (वार्ताहर)