अभाविपचा महाविद्यालये सुरू करण्यासाठी आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:00+5:302021-02-05T05:44:00+5:30
नाशिक : महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क घेऊनही महाविद्यालये बंदच आहेत ही बाब शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ...

अभाविपचा महाविद्यालये सुरू करण्यासाठी आक्रोश
नाशिक : महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क घेऊनही महाविद्यालये बंदच आहेत ही बाब शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी असल्याची टीका करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी (दि.२) कॉलेज रोडवर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलासमोर जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालये व महाविद्यालयांची वसतिगृहे तत्काळ सुरू करावीत, त्याचसोबत बसथांबा, खानावळी इत्यादी विद्यार्थी गरजेची ठिकाणेही सुरू करावीत, अशी मागणी अभाविपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनातून केली आहे.
अभाविपतर्फे नाशकातील बीवायके, केटीएचएम आणि ओझर येथील के.के. वाघ महाविद्यालात आंदोलन करीत ‘शिक्षण मंत्री दौऱ्यावर विद्यार्थी मात्र वाऱ्यावर’, ‘सुरू करा! सुरू करा! महाविद्यालय सुरू करा ’ अशा घोषणाबाजीसह विद्यार्थ्यांनी आक्रोश नोंदवत आंदोलन केलेे. राज्यभरातील महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यांमार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदनही यावेळी देण्यात आले. अभाविपचे प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हा संयोजक अथर्व कुलकर्णी, जिल्हा सहसंयोजक ऐश्वर्या पाटील, महानगरमंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंखे, महानगर सहमंत्री सौरभ धोत्रे, ओम मालुंजकर, दिव्या सिंग, श्रेयस पारनेरकर, हर्षदा कदम, ऋषिकेश शिरसाठ, अद्वैत जोशी, कौस्तुभ पिल्ले, देवेश चिंचाळकर, संस्कार सोनवणे, संस्कृती शेळके, वैष्णवी शिरसाठ, सचिन शितोळे, पायल छाजेड, तपस्वी गोटरणे, ऋची अग्रवाल आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो- ०२पीएचएफबी ८३) महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना अभाविपचे विराज भामरे, अथर्व कुलकर्णी, ऐश्वर्या पाटील, सिद्धेश खैरनार, राकेश साळुंखे, सौरभ धोत्रे, ओम मालुंजकर, दिव्या सिंग, श्रेयस पारनेरकर, हर्षदा कदम, ऋषिकेश शिरसाठ, अद्वैत जोशी, तपस्वी गोटरणे, ऋची अग्रवाल आदी.