शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 20:28 IST

रिक्षाची झडती घेतली असता ४४ हजार रुपये किमतीच्या ४० धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींसह रिक्षा, १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्दे१ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त म्होरक्या सराईत गुन्हेगार पळून जाण्यास यशस्वी

नाशिक : पाच, दहा नव्हे तर तब्बल ४० नव्याकोऱ्या धारधार तलवारींचा साठा मालेगावात वाहून आणला असता पोलिसांनी सापळा रचुन तो शिताफीने हस्तगत केला. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी बाळगणाऱ्या तीघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर त्यांचा म्होरक्या सराईत गुन्हेगार हा पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरला. परराज्यांमधून इतक्या तलवारी शहरात नेमक्या कशासाठी आणल्या व यामागील काय उद्देश आहे, याचा चौहोबाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी परिसरात एका हॉटेलजवळ मंगळवारी (दि. १) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका गाडीतून धारदार शस्त्रे शहरात आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विशेष पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आर. के. घुगे यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. यावेळी संशयास्पद रिक्षा (एमएच४१ ए.टी ०१०७) येताच पोलिसांनी रिक्षा रोखली. रिक्षात बसलेल्या मोहम्मद आसिफ शकिर अहमद (२७,रा.मर्चंन्टनगर). इरफान अहमद हबीब अहमद (३८,रा.) अतिक अहमद सलीम अहमद (२८,रा. इस्लामपुरा)यांना अटक करण्यात आली. या तीघांचा म्होरक्या सराईत गुन्हेगार मोहम्मद मेहमूद अब्दुल राशिद हा पळून गेला. त्याच्यावर यापुर्वीही शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे पाटील म्हणाले. त्याचा मागावर पथक असून लवकरच त्यालाही अटक करण्यास यश येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

रिक्षाची झडती घेतली असता ४४ हजार रुपये किमतीच्या ४० धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींसह रिक्षा, १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मालेगाव पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि. २) पोलीस कोठडी सुनावली आहे.------

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसArrestअटकMalegaonमालेगांव