अजंग सोसायटी सभापतिपदी बच्छाव
By Admin | Updated: June 21, 2014 01:02 IST2014-06-20T22:14:14+5:302014-06-21T01:02:43+5:30
वडेल : अजंग सोसायटीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये जनराज्य आघाडीचे रामा बच्छाव यांची सभापती, तर विलास मोरे यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली

अजंग सोसायटी सभापतिपदी बच्छाव
वडेल : अजंग सोसायटीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये जनराज्य आघाडीचे रामा बच्छाव यांची सभापती, तर विलास मोरे यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली. निर्धारित वेळेत बच्छाव व मोरे यांचा अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी रामदास गुजर यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अजंग सोसायटीवर जनराज्य आघाडीचे वर्चस्व असून, माजी मंत्री प्रशांत हिरे, शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सोसायटीत व्यापारी गाळे उभारले आहेत.
अद्ययावत सुविधांनी युक्त असे भव्य व्यापारी संकुल उभारले आहे.
यावेळी संचालक समाधान अहिरे, दत्तू गांजे, शांतीलाल सोनवणे, यावंत अहिरे, संदीप अहिरे, संतोष अहिरे, अनिल बच्छाव, गोकुळ पवार व धनराज पवार यांच्यासह बाजीराव देवरे, विकास शेवाळे, पंडितराव जाधव, संजय पवार, वालचंद बच्छाव, भाऊराव अहिरे, धनराज पवार, बापू गांजे, ज्ञानेश्वर देवरे, गोकुळ सूर्यवंशी, चंदू चौधरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते..