जादूटोण्याच्या संशयातून महिलेस शिवीगाळ
By Admin | Updated: October 27, 2015 22:56 IST2015-10-27T22:55:42+5:302015-10-27T22:56:10+5:30
जायखेडा : परस्परविरोधी तक्रार दाखल

जादूटोण्याच्या संशयातून महिलेस शिवीगाळ
जायखेडा : येथील नुरानी मोहल्ला भागात राहणारी महिला जादूटोणा करते या संशयावरून तिला शिवीगाळ करून तिची बदनामी केल्याप्रकरणी जायखेडा पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुरानी मोहल्ल्यात राहणाऱ्या रूक्साना बानू मुज्जफर शेख ही महिला काळी विद्या करुन मुलांना आजारी पाडत असल्याचा आरोप करीत याच मोहल्ल्यात राहणाऱ्या निसार अब्दुल मसिद, जस्मिन अब्दुल निसार, बबलू अब्दुल निसार, इकबाल तस्वरखॉ पठाण, तस्लिमा इकबाल पठाण, व मौलाना (नाव माहीत नाही) यांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
त्यानुसार भा. दं. वि. कलम १४३, १४७, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. संशयितांनीही जायखेडा पोलिसांत
तक्र ार दाखल केली आहे.
याप्रकरणी भा. दं. वि. कलम ३८४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांचा अधिक तपास सपोनि आर. एन. होळकर करीत आहेत.