आषाढी एकादशी

By Admin | Updated: July 10, 2014 01:01 IST2014-07-09T21:41:27+5:302014-07-10T01:01:00+5:30

त्र्यंबकच्या अभिनव शाळेत वृक्षदिंडीत्

Aashadi Ekadashi | आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

 

त्र्यंबकश्वर : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभिनव बालविकास मंदिरच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संपूर्ण गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संतांचा संदेश देश पालखीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. गायधनी यांच्या पुढाकाराने व प्रिन्सिपल ज्योत्स्ना सोनखासकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा संदेश देत वृक्षदिंडी फिरविण्यात आली. सकाळी आकर्षक अशी दिंडी तयार करून त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची प्रतिमा, वृक्षांची रोपटे ठेवण्यात आली, वृक्षांची व प्रतिमेची पूजा करून दिंडीस प्रारंभ केला. टाळ-मृदंग तसेच लेजीम पथक यांच्या निनादात दिंडीला शोभा आली होती. सर्व मुले-मुली गणवेशात शोभून दिसत होते. तसेच शिक्षकवृंद सहभागी झाले होते. दिंडीमध्ये मुख्याध्यापकांसह शालेय सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख गोसावी, एस.जे. निकम, श्रीमती ढगे, संधान कांगणे, देवरे, पवार, धनवटे, क्रीडाशिक्षक पाळदे आदिंसह सेवकवृंद व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वृक्षदिंडी काढण्याचा उपक्रम अभिनवतर्फे करण्यात आला.

Web Title: Aashadi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.