विनाकारण फिरणाऱ्यांची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:51 PM2020-04-02T23:51:49+5:302020-04-02T23:52:20+5:30

जानोरी गावाने सध्या संपूर्ण लॉक डाऊन यशस्वी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करूनही काही महाभाग विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आल्यास अशांची कोरोनाची आरती करून त्यांना रस्त्यावर न येण्याची समज दिली जात आहे.

Aarti of revolvers without cause | विनाकारण फिरणाऱ्यांची आरती

विनाकारण फिरणाऱ्यांची आरती

Next
ठळक मुद्देजानोरी ग्रामपंचायतीचा उपक्रम : गावात जंतुनाशक फवारणी

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी गावाने सध्या संपूर्ण लॉक डाऊन यशस्वी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करूनही काही महाभाग विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आल्यास अशांची कोरोनाची आरती करून त्यांना रस्त्यावर न येण्याची समज दिली जात आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात लॉकडाऊन सुरू असून तो यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जे विनाकारण रस्त्यावर येतात अशा महाभागांची आरती करून यापुढे विनाकारण रस्त्यावर येऊ नये यासाठी समज दिली जात आहे. कोरोनाचा विषाणू आपल्या गावात शिरकाव करू नये यासाठी ग्रामपंचायतीने पूर्ण गावात निर्जंतुक करून लॉकडाऊन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सध्या आवश्यक वैद्यकीय सेवा व्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद आहेत. यात सर्व प्रमुख रस्ते बंद करून ग्रामपंचायत कर्मचारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना मज्जाव करतांना दिसत आहेत. जे विनाकारण रस्त्यावर फिरतात अशांना रस्त्यावर उभे करून त्यांची आरती करून कोरोनाविषयी त्यांना महत्त्व समजावून सांगितले जात आहे. शेजारच्या तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने लगतच्या गावांनी अधिक सतर्कता घेण्यास सुरु वात झाली आहे. यातच जऊळके-दिंडोरी , जानोरी, मोहाडी अशा गावांनी विशेष काळजी घेण्यास सुरु वात केली असून कारवाई करण्याचेही तयारी ग्रामपंचायतींनी केली आहे.
विनाकारण फिरणाºयांवर ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक संजय बोस यांनी कोरोना आरती तयार केली असून त्यांनी कर्मचारी श्याम खांबेकर, प्रवीण चौधरी, संजय बोस, योगेश रोंगटे, समाधान बेंडकुळे, पुंडलिक चारोस्कर यांना सोबत घेऊन संबंधितांना समज दिली जात आहे. गाव कोरोनापासुन लांबच रहावे यासाठी माजी जि.प. सदस्य शंकरराव काठे, सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील सुरेश घुमरे, तलाठी पाटील, ग्रामविस्तार अधिकारी के.के.पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत आहेत.

Web Title: Aarti of revolvers without cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.