कसबे सुकेणेत स्थानिक प्रश्नांकरिता  ‘आप’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:08 AM2018-03-24T00:08:51+5:302018-03-24T00:13:15+5:30

निफाड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्रमण कायम करणे, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली.

 AAP's Aam Aadmi Party for local questions | कसबे सुकेणेत स्थानिक प्रश्नांकरिता  ‘आप’चा मोर्चा

कसबे सुकेणेत स्थानिक प्रश्नांकरिता  ‘आप’चा मोर्चा

Next

कसबे सुकेणे : निफाड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्रमण कायम करणे, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. कसबे सुकेणे येथे आज शुक्रवारी निफाड तालुका आम आदमी पार्टी आणि कसबे सुकेणे शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. कसबे सुकेणे येथील दाऊदवली शाहबाबा यांच्या दर्ग्यासमोरील रहिवासी अतिक्रमण राज्य सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार कायम करणे, दिंडोरी-निफाड-सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण करणे व कसबे सुकेणे शहरात सुरू असलेली अवैध दारू आणि जुगार धंदे बंद करणे या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा करीत ग्रामपालिका, पोलीस ठाणे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच कोकणगाव रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हाप्रमुख अ‍ॅड. प्रभाकर वायचाळे, निरीक्षक सुभाष तंवर, अनिल कौशिक, उत्तम निरभवणे, सुरेश देवकर, अल्ताफ शेख, ज्ञानदेव वैद्य, संतोष पगारे, सागर खडताळे यांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन करून कसबे सुकेणे येथील रहिवास अतिक्रमण कसबे सुकेणे येथील कायम न झाल्यास मुंबईत नाशिकमध्ये आंदोलन छेडू, असा इशारा दिला. या प्रसंगी भारत पवार, निवृत्ती पवार, दोधू जोशी, संजय गांगुर्डे, संजय धुमाळ आदींसह शेकडो आपचे कार्यकर्ते व महिला पुरुष उपस्थित होते. कसबे सुकेणे व ओझर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
कोकणगाव-सुकेणे - चांदोरी रस्त्याची दुर्दशा थांबवावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी, या मागणीसाठी या मोर्चेकरांनी कोकणगाव रस्त्यावर वृक्षरोपण करीत निषेध नोंदविला. तसेच घोषणाबाजी केल्यामुळे बसस्थानक परिसर दणाणला होता.

Web Title:  AAP's Aam Aadmi Party for local questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPआप