आम आदमी पार्टीची निदर्शने

By Admin | Updated: January 31, 2017 00:38 IST2017-01-31T00:38:23+5:302017-01-31T00:38:35+5:30

इंदिरानगर : सिग्नल यंत्रणेसाठी जमावबंदीचा आदेश मोडला

Aam Aadmi Party's demonstrations | आम आदमी पार्टीची निदर्शने

आम आदमी पार्टीची निदर्शने

इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्याच्या ठिकाणी अद्यापपर्यंत सिग्नलयंत्रणा न बसविल्याने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि़३०) निदर्शने केली़ महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असताना निदर्शने करून जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या निदर्शकांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले़ मात्र नंतर या सर्वांना समज देऊन सोडून देण्यात आले़
गोविंदनगरकडून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडे येणाऱ्या चारचाकी वाहनांना बोगद्याला गर्डर लावून बंदी घालण्यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत़  विशेष म्हणजे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा मंजूर असूनही अद्यापपर्यंत बसविण्यात आलेली नाही़ या सिग्नल यंत्रणेसाठी सोमवारी सकाळी आम आदमी पार्टीचे जितेंद्र भाबे, जगबीर सिंग, पद्माकर अहिरे, सुमित शर्मा यांनी निदर्शने केली़ (वार्ताहर)


 

Web Title: Aam Aadmi Party's demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.