आकाशवाणी भाजीबाजार मोबाइल चोरट्यांचा अड्डा
By Admin | Updated: August 7, 2015 22:49 IST2015-08-07T22:48:49+5:302015-08-07T22:49:58+5:30
आकाशवाणी भाजीबाजार मोबाइल चोरट्यांचा अड्डा

आकाशवाणी भाजीबाजार मोबाइल चोरट्यांचा अड्डा
नाशिक : भाजी खरेदीमध्ये गुंतलेल्या गिऱ्हाईकांच्या खिशातील मोबाइल चोरणारी टोळी संपूर्ण शहरातील भाजीबाजारांमध्ये कार्यान्वित झाली असून, याचा फटका खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे़ या सर्व घटनांमध्ये आकाशवाणी भाजीबाजार अग्रेसर असून, या ठिकाणाहून मोबाइल चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़
गंगापूररोडवरील आकाशवाणीशेजारी सायंकाळच्या सुमारास मोठा बाजार भरतो़ याठिकाणी परिसरातील शेतकरी ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सायंकाळी या बाजारात गर्दी करतात़ या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे नागरिकांची रोकड तसेच मोबाइलवर हात साफ करीत असल्याचे चित्र आहे़ महात्मानगर येथील विष्णुनाथ प्लाझामधील रहिवासी विशाल देवीदास बागुल हे मंगळवारी भाजी खरेदीसाठी आले होते़
भाजी खरेदीत व्यस्त असलेल्या बागुल यांच्या खिशातून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला़ या प्रकरणी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आकाशवाणी भाजीबाजारातील मोबाइल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे़ (प्रतिनिधी)