साडेसात हजार बॅँक खात्यांसाठी आता ‘आधार’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:08 IST2020-01-08T01:07:29+5:302020-01-08T01:08:49+5:30
नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.

साडेसात हजार बॅँक खात्यांसाठी आता ‘आधार’ मोहीम
नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे अशा शेतकºयांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहेत.
सदर योजना आधार लिंक असल्याने ज्या कर्जदार शेतकºयांचे बॅँक खाते कर्ज खात्याशी लिंक आहे अशा शेतकºयांना लाभ मिळण्यास कोणतीही अडचण नाही. आधार लिंक नसल्याने या योजनेपासून दोन लाखांपर्यंतचे कर्जदार शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनाने बॅँक खात्याशी आधार जोडणी न केलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करण्याचे आणि त्यांचे खाते आधाराशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा शेतकºयांची यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्णात ७६७६ शेतकºयांची खाते आधार लिंक करण्याचे काम महसूल आणि कृषी विभागाला करावे लागणार आहे. जिल्ह्णातील सुमारे दीड लाख खातेदारांना या योजनेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेला एकही कर्जदार शेतकरी वंचित राहणार नाही.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सुमारे १ लाख २३ हजार खातेदार असून, त्यापैकी ४६४ खातेदार आधार संलग्न नाहीत त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या खातेधारकांना तालुक्यातील आधार केंद्रांवर घेऊन जात त्यांचे आधार अपडेशन आणि लिंक करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. जे खातेदार शेतकरी घराबाहेर पडू शकत नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधार लिंक आणि अपडेशन केले जाणार आहे. बॅँक खात्याशी आधार जोडणी केलेले असले तरी त्यांचे ‘थमइंप्रेशन’ जुळत नसल्याने त्यांच्या आधाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काहींनी अद्यापही आधारजोडणी केलीच नसल्याचीदेखील प्रकरणे आहेत.
शेतकºयांनी केवळ जिल्हा बॅँकेतूनच नव्हे तर राष्टÑीयीकृत बॅँकांकडूनही पीककर्ज घेतलेले आहे. पीककर्ज देणाºया सुमारे ३० राष्टÑीयीकृत बॅँकांकडील ७२१२ आणि जिल्हा बॅँकेकडील ४६४ असे एकूण ७६७६ खाते आधारसंलग्न नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा यंत्रणा सज्जबॅँक खात्यांची आधार जोडणी नसलेल्या शेतकरी खातेधारकांची माहिती समोर आल्यानंतर अशा खातेधारकांचे आधार संलग्नता करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनावर शासनाने जबाबदारी सोपविलेली आहे. यासंदर्भातील गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला होता. शेतकºयांना आधार केंद्रावर आणून त्यांचे अपडेशन केले जाणार आहे. प्रसंगी शेतकºयांच्या घरी जाऊनही आधार अद्ययावत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही अशा ठिकाणी आधार प्रमाणिकरणासाठी इंटरनेटची आवयकता आहे. अशा गावातील शेतकºयांना नजीकच्या गावात नेऊन तेथील आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण केल्या जातील. प्रसंगी अशा शेतकºयांसाठी वाहनांचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधार नसलेली खाती
तालुका जोडणी नसलेली खाती
नाशिक ००
मालेगाव १७
चांदवड ५९
देवळा ०३
सटाणा ०५
कळवण ८६
दिंडोरी ०४
पेठ १२
सुरगाणा ००
इगतपुरी ५६
त्र्यंबक ०४
सिन्नर ३१
नांदगाव ३०
निफाड ७१
येवला ८६