नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण नोंदीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.दरम्यान कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे घोटी येथे जिल्हा बँकेत गर्दी होणार नाही या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे चेअरमन तथा घोटी बाजार समितीचे संचालक शिवाजी शिरसाठ यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे उद्घाटन केले.शासनाने जिल्हा बॅँकेला कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. त्या आदेशानुसार आधार प्रमाणीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. इगतपुरी तालुक्यातील एकूण एक हजार सहाशे ४७ शेतकरी सभासद असून, जिल्हा बॅँकेला इगतपुरी तालुक्यासाठी कर्जमाफीचे १२ कोटी ९६ लाख मिळणार आहेत. बॅँकेचे मुख्य काम असलेले पीककर्ज बंद होते. राज्य शासनाने जिल्हा बॅँकेला कर्जमाफी झालेल्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हा बँकेचेविभागीय अधिकारी एम. आर. बोंबले, मडके, भाऊसाहेब धोंगडे , वैभव शिरसाठ तर सर्व सोसायटी सभासद, संचालक मंडळ उपस्थित होते.
आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:55 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण नोंदीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू
ठळक मुद्देसर्व सोसायटी सभासद, संचालक मंडळ उपस्थित होते.