सलग बारा तास पुस्तक वाचण्याचा, अभ्यासाचा उपक्रम - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन
By संजय पाठक | Updated: April 14, 2023 18:26 IST2023-04-14T18:26:10+5:302023-04-14T18:26:21+5:30
नाशिक- शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,अशी शिकवण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. आजही डॉ. आंबेडकर यांची शिकवणूक महत्वाची ...

सलग बारा तास पुस्तक वाचण्याचा, अभ्यासाचा उपक्रम - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन
नाशिक- शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,अशी शिकवण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. आजही डॉ. आंबेडकर यांची शिकवणूक महत्वाची आहे. आज सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध उपक्रमातून अभिवादन केले जात असताना नाशिकमधील दोन संस्थांनी आगळा वेगळा उपक्रम राबवून
अभिवादन केले.
नाशिक येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक, प्राथमिक विद्यालय व इंग्रजी माध्यम अशोकनगर येथे इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांची वाचन साखळी घेण्यात आली. सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत विशिष्ट वेळ ठरवून विद्यालयात येऊन एकेक तास
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचे वाचन केले.
संस्थेचे सचिव विश्वास ठाकूर यांनी यावेळी संकल्पना मांडतानाच वंचीत मुलांना शिक्षकांनी दत्तक घ्यावे असे आवाहन केले. तर दुसरीकडे सिडको भागातील धम्मगिरी येाग महाविद्यालयात युवकांनी बारा तास सलग वाचनाचा उपक्रम राबवला.