शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी हाजीर हो! नाशिकच्या न्यायालयाचे निर्देश

By संजय पाठक | Updated: March 1, 2025 19:53 IST

जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली.

संजय पाठक, नाशिक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काढलेल्या कथित अनुद्गार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा असे निर्देश आज नाशिकच्या न्यायालयाने दिले आहेत.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. यादरम्यान त्यांनी वर्धा येथे बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा  माफीवीर असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. त्या संदर्भात भावना दुखावल्याने नाशिकमधील सावरकरप्रेमी देवेंद्र भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या न्यायालयात बदनामी फौजदारी दावा कलम ५००,  ५०४ अन्वये दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली.

आज राहुल गांधी यांनी उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण त्यांचे वकील जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली. याच वेळी राहुल गांधी यांनी यांना न्यायालयात कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची आणि प्रसंगी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी असाही अर्ज राहुल गांधी यांच्या वकिलांनी सादर केला आहे. मात्र त्यावर पुढील तारखेला म्हणजे ९ मे रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती अॅड मनोज पिंगळे यांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNashikनाशिक