शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या एका प्रसिद्ध बिल्डरचे राहत्या घरापासून अपहरण; परिसरात उडाली खळबळ

By अझहर शेख | Updated: September 3, 2023 05:54 IST

कुटुंबियांशी चर्चा करून माहिती घेत तातडीने विविध पथके वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना करण्यात आली.

नाशिक : शहरातील एक सुप्रसिद्ध नामवंत बांधकाम व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरापासून शनिवारी (दि.२) अपहरण केल्याची घटना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाचे आदेश देत विविध पथके शोधासाठी रवाना केली आहेत.रविवारी पहाटे पोलिसांची सर्वच पथके अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम समुहाचे  अध्यक्ष पदावर असलेले बांधकाम व्यावसायिकाचे त्यांच्या राहत्या घरासमोरून  अज्ञात इसमांनी दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर करत अपहरण केले. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच त्वरित सर्वच पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह गुन्हे शाखेच्या तीनही युनिटचे अधिकारी, कर्मचारी बांधकाम व्यावसायिक राहतात त्या बंगल्याजवळ दाखल झाले.

कुटुंबियांशी चर्चा करून माहिती घेत तातडीने विविध पथके वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना करण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून त्याआधारे अपहरणकर्त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे रविवारी मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात बसून विविध पथकांकडून माहिती घेत मार्गदर्शन करत होते. पोलिसांच्या पथकांनी मुंबई, पुणे, पालघर, सापुतारा च्या दिशेने माग काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलिसांनाही याबाबत माहिती कळवून सतर्क राहत जिल्हा सीमावर्ती भागात नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम व्यवसायिकाच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस