जमिनीच्या वादातून ३८ वर्षीय महिलेला लाठ्या-काठ्यांनी मारहाण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 15:30 IST2023-03-23T15:30:10+5:302023-03-23T15:30:42+5:30
जखमी महिलेला अभोणा ग्रामीण रुग्णालयातून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

जमिनीच्या वादातून ३८ वर्षीय महिलेला लाठ्या-काठ्यांनी मारहाण; गुन्हा दाखल
पाळे खुर्द (जि. नाशिक) - कळवण तालुक्यातील तिऱ्हळ, गांडूळमुख येथील महिला चंद्रकला दीपक बागुल (३८) हीस जमिनीच्या वादातून लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबतची फिर्याद अभोणा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. फुलाबाई सुभाष बागुल (४०, रा. तिऱ्हळ खुर्द) यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सदर घटनेतील संशयित प्रभाकर सखाराम बागुल, शामराव शिवराम बागुल, नाना शिवराम बागुल, प्रकाश पंडित बागुल, राजेंद्र प्रकाश बागुल, हेमराज प्रकाश बागुल, मनोहर मधुकर बागुल, अनिल लीलाचंद बागुल, जयराम बाबूराव बागुल (रा. सर्व गांडूळमुख) यांनी माझ्यासह सोबत असलेले प्रभाकर पवार, दिनेश बागुल, सागर सुभाष बागुल यांना जबर मारहाण केली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक तपास पोलिस हवालदार संतोष सोनवणे करत असून जखमी महिलेला अभोणा ग्रामीण रुग्णालयातून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.