शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घरफोडीतील टोळीकडून ९० मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:19 IST

देवळाली कॅम्प परिसरातील मोबाइलच्या दुकानात घरफोडी करून विविध कंपन्यांचे ९० मोबाइल चोरणाºया चौकडीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ या चौकडीमध्ये शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (वय २३, रा. भगूर), फईम ऊर्फ बबन अश्पाक शेख (वय ३३, रा. भगूररोड), सागर मुन्ना सोळंखी (वय ३०, रा. देवळाली कॅम्प) आणि निखील विजय गलोत (रा. जुनी स्टेशनवाडी) अशी घरफोडीतील संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून चोरी केलेले ९० मोबाइल व रिक्षा असा सुमारे चार लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील मोबाइलच्या दुकानात घरफोडी करून विविध कंपन्यांचे ९० मोबाइल चोरणाºया चौकडीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ या चौकडीमध्ये शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (वय २३, रा. भगूर), फईम ऊर्फ बबन अश्पाक शेख (वय ३३, रा. भगूररोड), सागर मुन्ना सोळंखी (वय ३०, रा. देवळाली कॅम्प) आणि निखील विजय गलोत (रा. जुनी स्टेशनवाडी) अशी घरफोडीतील संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून चोरी केलेले ९० मोबाइल व रिक्षा असा सुमारे चार लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ देवळाली कॅम्प जुना बसस्टॉप परिसरातील मोबाइल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याची घटना गतवर्षी घडली होती़ या मोबाइल चोरीचा तपास पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर व सहायक पोलीस आयुक्त रवींद्र नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता़ शहर गुन्हे शाखा युनिट एकमधील हवालदार रवींद्र बागुल यांना या घरफोडीतील संशयितांबाबत माहिती मिळाली होती़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या सखोल चौकशीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला़  गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, हवालदार संजय मूळक, शिपाई गणेश वडजे, स्वप्नील जुंद्रे, विशाल देवरे, दीपक जठार यांच्या पथकाने ही कारवाई केली़  मोबाइल दुकानावर पाळत ठेवून या चौघांनी दुकान फोडले व चोरी केलेल्या मोबाइलची विक्री केली होती़ पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तांत्रिक शाखेच्या मदतीने या मोबाइलचा तपास करून गुन्हे शाखेस सहकार्य केले व चौघांचे बिंग फुटले़ या संशयितांकडून ९० मोबाइल, मोबाइल अ‍ॅक्सेसरिज व गुन्ह्यातील रिक्षा असा चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे