शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:27 IST

नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात लकी ड्रॉ योजना सुरू करून सभासदांना प्रतिमाह १ लाखापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार ७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा करून घेत बक्षीस न देता फसवणूक करणाºया ‘माँ गायत्री मार्केटिंग’च्या अकरा संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात लकी ड्रॉ योजना सुरू करून सभासदांना प्रतिमाह १ लाखापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार ७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा करून घेत बक्षीस न देता फसवणूक करणाºया ‘माँ गायत्री मार्केटिंग’च्या अकरा संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे संचालकांनी फसवणूक केलेल्या नागरिकांनी ‘लोकमत’कडे आपली कैफियत मांडल्यानंतर त्यांची व्यथा मालिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती़ अखेर सभासदांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि़२४) सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला़  सरकारवाडा पोलीस ठाण्यात उमेश रामदास सिरसाठ (४१, रा़मेशी, ता़देवळा, जि़नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठक्कर बाजारमधील जीएफ १४ मध्ये कार्यालय असलेल्या ‘माँ गायत्री मार्केटिंग’चे संचालक संशयित प्रद्युम्न भगवंतराव गावंडे, शरद भगवान पाटील, भरत यशवंत पाटील, सारंग यादव पानसरे, विजय रामदास कदम, राहुल राजेंद्र बोरसे, विजय पुंडलीक पाटील, भूषण रामचंद्र भोळे, विजय मधुकर कोळी, मनोज रघुनाथ कोळी, अनिल नवनाथ शिंदे यांनी ५ एप्रिल २०१६ ते २० जून २०१७ या कालावधीत लकी ड्रॉच्या नावाखाली ९ हजार ९९९ सभासद गोळा करून या १५ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक सभासदाकडून ९ हजार ४०० रुपये गोळा केले़ प्रतिमहिना लकी ड्रॉ काढून एक लाखांपासून ते २५ हजार रुपयांचे बक्षिसाचे आमिष व शेवटी बक्षीस न मिळालेल्या ९ हजार ७०० सभासदांना क्राऊन कंपनीचा २२ इंची एलइडी टीव्ही देण्याचे आमिष दाखविले़ त्यामुळे सिरसाठ व त्याच्यासारख्या अनेकांनी एजंट होऊन नागरिकांकडून पैसे गोळा करून संचालकांकडे दिले़ मात्र, लकी ड्रॉ काढून सभासदांनी बक्षिसांचे वाटप केल्यानंतर उर्वरित ९ हजार ७०० सभासदांनी संचालकांना टीव्हीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व कार्यालयही बंद केले़ यामुळे सभासदांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे़ टाळाटाळ गायत्री मार्केटिंगने फसवणूक केलेले सभासद गत चार-पाच दिवसांपासून गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चकरा मारीत होते़ मात्र त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता शेवटी या प्रकरणात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर तसेच सभासदांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सभासदांनी सांगितले़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा