शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

९४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:42 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. या शिक्षकांना पुढील प्रक्रियेतूनदेखील बाद करण्यात आले आहे.  शासनाने आॅनलाइन प्रक्रियेद्वारे बदलीप्रक्रिया पूर्ण केली मात्र यामध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग एक व दोनमध्ये खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविल्या आहेत अथवा बदलीतून सूट घेतली अशा १९४ शिक्षकांची सुनावणी गिते यांनी घेतली होती. चौकशीत  खोटी माहिती भरणाºया ९४ शिक्षकांना डॉ. नरेश गिते यांनी दणका दिला आहे.  एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. दोषी ठरल्यामुळे यापुढे त्यांना बदलीसाठी विकल्प भरता येणार नसून त्यांना अवघड क्षेत्रात काम करावे लागणार आहे.  शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्ह्णातील १९४ शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने चुकीचे अंतर, खोटे वैद्यकीय कारण, पती-पत्नी एकत्रीकरण याबाबत खोटी माहिती भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्व १९४ शिक्षकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या. या शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सतत्येविषयी तसेच बदली अंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यात आल्या होत्या. यापैकी १०० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यापैकी ९४ शिक्षकांचा खुलासा अमान्य करण्यात आला असून त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.आणखी १५ शिक्षक रडारवरया शिक्षकांची दोषी ठरल्यामुळे पुढील बदली प्रक्रि येत त्यांना विकल्प राहणार नसून अवघड भागात त्यांची बदली होणार आहे. अशा शिक्षकांचा काळ्या यादीत समावेश करण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ९४ व्यतिरिक्त अजून १५ शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांचेवर कार्यवाही करण्यात येणार आहे.कारवाईवर मात्र नाराजी कायमशिक्षकबदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून त्यासाठी लढणाºया शिक्षकांच्या कृती समितीकडून मात्र सदर कारवाई परिणामकारक नसल्याचे म्हटले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण शासन यंत्रणेची दिशाभूल करण्याबरोबरच अशा शिक्षकांमुळे अन्य प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय झाल्याने गिते यांच्या कारवाईने न्याय मिळत नसल्याच्ची भावना कृती समितीची आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षक