मालेगावी नवापुऱ्यात ९२ हजारांची चोरी

By Admin | Updated: February 3, 2016 21:48 IST2016-02-03T21:45:50+5:302016-02-03T21:48:47+5:30

मालेगावी नवापुऱ्यात ९२ हजारांची चोरी

9 2 thousand stolen in Malegaon | मालेगावी नवापुऱ्यात ९२ हजारांची चोरी

मालेगावी नवापुऱ्यात ९२ हजारांची चोरी

मालेगाव : शहरातील नवापुरा भागातील सुलेमानी चौकातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी रोख रकमेसह ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी रहेमा मोहमद नसिम (३८) रा. सुलेमानी चौक, नवापुरा या महिलेने आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीत ४५ हजार रुपये रोख व ४७ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.
दुचाकीची चोरी करणाऱ्यांनी
ठेवली दुसरी दुचाकी
येथील कॅम्प पोस्ट कार्यालयाजवळ बिपीन जगदाळे यांच्या मालकीची घरासमोर लावलेली प्लॅटिना दुचाकी (एमएच ४१ के २६७) पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे. यावेळी चोरट्यांनी जगदाळे यांच्या दुचाकीच्या जागेवर कॅम्पातून चोरलेली हीरो-होंडा पॅशन (एमएच ४१ डब्लू ४२३१) ही दुचाकी आणून उभी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, या प्रकरणातील हीरो-होंडा पॅशन ही गाडी मूळ मालकाला परत देण्यात आली आहे. यावेळी तिच्यातील पेट्रोल संपलेले होते. त्यावरुन पॅशन गाडी इंधनाअभावी बंद पडल्याने या ठिकाणी उभी करून तिच्या जागी प्लॅटिना दुचाकी चोरून नेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: 9 2 thousand stolen in Malegaon