चित्पावन ब्राह्मण संघातर्फे ८ ला महोत्सव

By Admin | Updated: May 7, 2016 00:02 IST2016-05-06T22:53:31+5:302016-05-07T00:02:24+5:30

चित्पावन ब्राह्मण संघातर्फे ८ ला महोत्सव

8th Festival of Chitpavan Brahmin Sangh | चित्पावन ब्राह्मण संघातर्फे ८ ला महोत्सव

चित्पावन ब्राह्मण संघातर्फे ८ ला महोत्सव

नाशिक : येथील चित्पावन ब्राह्मण संघाच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त रविवारी (दि. ८) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काका गद्रे मंगल कार्यालयात सायं. ६ वाजता वेद पुरस्कार, परशुराम पुरस्कार वितरण आणि अमृत महोत्सवी सत्कार सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे उपस्थित राहणार आहे. यावेळी वेदमूर्ती सिद्धांत गाडगीळ, पुणे (ऋग्वेद), वेदमूर्ती मधुर जोशी, त्र्यंबकेश्वर (यजुर्वेद), महेश जोशी, उदगीर, लातूर (अथर्ववेद) व रोहित कळवे, जिंतुर, परभणी (सामवेद) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 8th Festival of Chitpavan Brahmin Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.