शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
4
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
5
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
6
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
7
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
8
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
9
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
10
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
11
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
12
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
13
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
14
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
15
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
16
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
17
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
18
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
19
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
20
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

८६१ टंचाईग्रस्त गावे झाली जलपरीपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:19 AM

जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकरोड : जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही झगडे यांनी यावेळी व्यक्त केला.  जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाल्याचा दावा केला. गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. त्यामध्ये प्रस्तावित २५ हजार ८०५ इतक्या कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. ८६१ गावांची पाण्याच्या टंचाईतून मुक्तता झाली आहे. पूर्ण झालेल्या कामांपैकी २१ हजार १३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम क्षमतेची पाणीसाठा निर्मिती झाली असून, त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एकदा पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी खर्च करण्यात आलेला आहे. २०१७-१८ या वर्षासाठी विभागातील ८४७ गावांची निवड जलयुक्त शिवारसाठी करण्यात आली असून, या गावांत प्रस्तावित २१ हजार ३६७ कामांसाठी ४८९ कोटी रुपयांचा आराखडा निश्चित करण्यात आल्याचे झगडे यांनी सांगितले. ३ हजार ५९५ कामांना कार्यारंभ आदेश दिलेला असून, ९७९ कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. पेयजलसंबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाºयामार्फत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे झगडे यांनी सांगितले. मजगीमुळे रब्बी व उन्हाळी हंगाम असुरक्षित होणार असेल तरीही अशी कामे आता होणार नाहीत, असे महेश झगडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcommissionerआयुक्त