बॅँक खात्यातून ८१ हजार लंपास
By Admin | Updated: October 5, 2015 23:27 IST2015-10-05T23:26:48+5:302015-10-05T23:27:44+5:30
एटीएम क्रमांकाचा आधार : तोतया बॅँक कर्मचाऱ्याचा प्रताप

बॅँक खात्यातून ८१ हजार लंपास
नाशिक : ‘मी बांद्रा मुंबई येथील एसबीआय येथून बोलते आहे’ असे सांगून एका तोतया महिला बॅँक कर्मचाऱ्याने खाते क्रमांक व खात्यातील शिल्लक रकमेची माहिती दिली व एटीएम क्रमांक जाणून घेत कमोदनगरच्या एका महिला बॅँक खातेदाराची फसवणूक करत एकूण ८१ हजार ९९६ रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कमोदनगर येथे राहणाऱ्या चित्रा रामकृष्ण पाटील (वय ४९) यांच्या एसबीआयच्या दोन खात्यांमधून प्रत्येकी ५१ हजार ९९६ व ३० हजार असे एकूण ८१ हजार ९९६ रुपयांची रक्कम तोतया महिला बॅँक कर्मचारीने लंपास केली आहे. याप्रकरणी पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरातील सर्वच बॅँकांक डून खातेदारांना लघुसंदेशामार्फत जागरूक केले जात आहे. कोणीही बॅँकेचे नाव घेऊन भ्रमणध्वनीवर अथवा दूरध्वनीवर संपर्क साधल्यास एटीएम कार्डाच्या क्रमांकाची तसेच बॅँक खात्याची कु ठलीही माहिती सांगू नये, असे वारंवार बजावले जात असतानादेखील नागरिक भामट्यांच्या मंजूळ आवाजाला बळी पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. बॅँकांकडून कमालीची गोपनियता बाळगली जात असताना तोतया भामट्या चोरट्यांना बॅँक खात्यातील शिल्लक रकम खाते क्रमांकासह कशी समजते, असा यक्ष प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे; मात्र या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही बॅँके च्या प्रशासनाकडे नसल्याने हे कोडे निर्माण झाले आहे. तसेच ज्या भ्रमणध्वनीक्रमांकावरून संपर्क साधला जातो तो भ्रमणध्वनी क्र मांक पोलिसांना देऊनदेखील त्याबाबतचा कुठलाही तपास पोलीस यंत्रणेकडून लावला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)