आरटीईचे ८०२ प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST2021-06-30T04:10:14+5:302021-06-30T04:10:14+5:30

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असून, ...

802 RTE admissions confirmed | आरटीईचे ८०२ प्रवेश निश्चित

आरटीईचे ८०२ प्रवेश निश्चित

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असून, बुधवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. मागील १८ दिवसात केवळ ८०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर अजूनही तब्बल ३ हजार ४०६ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेंतर्गंत आतापर्यंत ८०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, १ हजार ५२१ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्राथमिक टप्प्यात आहेत. हे प्रवेश निश्चित झाले, तर उर्वरित १ हजार ८८५ विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला आहे. त्यामुळे निश्चित मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करू न शकणाऱ्या पालकांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असून, मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: 802 RTE admissions confirmed