बचत खात्यातून ८० हजारांचा अपहार
By Admin | Updated: March 5, 2017 01:29 IST2017-03-05T01:28:44+5:302017-03-05T01:29:04+5:30
नाशिक : पोस्टातील खातेदाराची बनावट सही करून त्याच्या खात्यातील ८० हजार रुपये काढून घेत खातेदार तसेच पोस्टाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

बचत खात्यातून ८० हजारांचा अपहार
नाशिक : पोस्टातील खातेदाराची बनावट सही करून त्याच्या खात्यातील ८० हजार रुपये काढून घेत खातेदार तसेच पोस्टाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित गौतमा शिवाजी निर्भुवन (फ्लॅट नंबर १, शाही आगमन अपार्टमेंट, पाण्याच्या टाकीजवळ, मखमलाबाद) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निर्भुवन या महिलेने १९ सप्टेंबर २०१५ रोजी पोस्टाचे खातेदार नारायण शंकर पवार (३६३५२२) यांची स्वाक्षरी करून ८० हजार रुपये काढून घेतले़
हा प्रकार पोस्ट खात्याच्या लक्षात आल्यानंतर सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)