येवल्यातील ८ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:07 IST2020-08-31T23:57:22+5:302020-09-01T01:07:31+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ८ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि. ३१) पॉझीटीव्ह आले आहेत.

येवल्यातील ८ अहवाल पॉझीटीव्ह
लोकमत न्युज नेटवर्क
येवला : शहरासह तालुक्यातील ८ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि. ३१) पॉझीटीव्ह आले आहेत.
बाधितांमध्ये शहरातील बाजीराव नगर येथील ६५ वर्षीय महिला, ३१ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा, वल्लभ नगर ६५ वर्षीय पुरूष, पाटोळे गल्ली ३५ वर्षीय पुरूष व तालुक्यातील अंदरसूल येथील ३५ वर्षीय महिला, उंदिरवाडी ६५ वर्षीय महिला, कोटमगाव ५४ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. यात नाशिक लॅबचे ७ अहवाल तर एक अहवाल रॅपीड अँटीजेन टेस्टचा आहे.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३७२ झाली असून आजपर्यंत २७७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ६७ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.