पुलांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 19:12 IST2018-09-05T19:10:57+5:302018-09-05T19:12:48+5:30

नांदगाव मतदार संघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील गावांना जोडणा-या पुलांची दुरावस्था झाली होती. २०१८ नाबार्ड अंतर्गत या पुलांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्टवादीचे नेते विनोद शेलार यांनी दिली.

8 crores sanctioned for bridge works | पुलांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

पुलांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

मालेगाव तालुक्यातील गावांना जोडणा-यापुलांची दुरावस्था झाली होती. अपघाताची शक्यता व्यक्त होत होती. याची दखल घेत नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार पंकज भुजबळ यांनी पुलांच्या कामासाठी शासनाकडे निधी मागितला होता. नाबार्ड अंतर्गत निमगाव ते जळगाव सुकी नदीवरील वाणेवाडी पुलाच्या कामासा दीड कोटी, निमगाव ते जळगाव भडकम पुलास एक कोटी, अस्तेगाव, निंबायती, निमगाव, ज्वार्डी रस्त्यावरील पुल कामास ७५ लाख, चिंचगव्हाण ते नरडाणे रस्त्यावरील पुलास ७५ लाख, कळवाडी ते देवघट रस्त्यावरील दोघा पुलांना दीड कोटी, जळगाव ते निंबायती रस्त्यावरील पुल कामास १ कोटी २५ लाख, जळगाव ते निंबायती रस्त्यावरील पुलाच्या कामास १ कोटी २५ लाख, जळगाव ते सावकारवाडी अंधारपाडे येथील साबर नाल्यावरील पुलास एक कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

Web Title: 8 crores sanctioned for bridge works