शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधून अद्याप ७९ बसेस मजूरांना घेऊन रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:49 IST

शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली

ठळक मुद्देमजुरांना कसारा नाकाबंदी पॉइंटवर मॅँगो ज्यूसच्या बाटल्या

नाशिक : मुंबईमार्गे पायपीट करणाऱ्या मजुरांना कसारा नाकाबंदी पॉइंटवरून नाशिक विभागाच्या हद्दीतून इगतपुरी, घोटी मार्गे पुढे थेट मध्यप्रदेश-महाराष्टÑच्या सीमेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत नेऊन सोडले जात आहे. कालपासून अद्याप नाशिक विभागातून ७९ बसेसद्वारे मजूरांना मध्यप्रदेश सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली असली तरी बहुतांश प्रवासी मजूर आपला बि-हाड घेत पायपीट करताना दिसून येत आहेत. काही मजूर ‘डिस्टन्स’ बाजूला ठेवत मिळेल त्या मालवाहू वाहनांमधूनही प्रवास करत आहेत. मात्र प्रादेशिक परिवहन विभाग, ग्रामिण पोलीस, महसूल विभागाकडून सातत्याने गस्ती पथकांद्वारे मजुरांना आवाहन केले जात आहे. सरकारने एसटीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, यामुळे कोणीही पायी किंवा अन्यप्रकारच्या मालवाहू वाहनांमधून प्रवास करू नये असे आवाहन मराठी, हिंदी भाषेतून केले जात आहे. शनिवारपासून बसेस नाशिक विभागातून मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडल्या जात आहेत. शनिवारी ४२ तर रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ३७ बसेसमधून मजूरांची वाहतूक करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.मुंबईकडून येणा-या मजुरांना कसारा नाकाबंदी पॉइंटवर मॅँगो ज्यूसच्या बाटल्याही प्रशासनाकडून पुरविल्या जात आहेत. सुमारे ५००० बाटल्यांची येथे व्यवस्था करण्यात आल्याचे मुंडावरे यांनी सांगितले. नागरिकांनी कुठल्याहीप्रकारे पायी प्रवास करू नये, शासनाच्या मोफत एसटी सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी