पंचवटीत घरपट्टी, पाणीपट्टी ७८ लाख रुपयांचा कर जमा
By Admin | Updated: November 13, 2016 00:25 IST2016-11-13T00:13:39+5:302016-11-13T00:25:09+5:30
पंचवटीत घरपट्टी, पाणीपट्टी ७८ लाख रुपयांचा कर जमा

पंचवटीत घरपट्टी, पाणीपट्टी ७८ लाख रुपयांचा कर जमा
पंचवटी : शासनाने चलनातील पाचशे, एक हजार रुपये दराच्या नोटा रद्द केल्यानंतर जुन्या पाचशे व एक हजार रु पये दराच्या नोटा महापालिकेत कर म्हणून स्वीकारला जात असल्याने पंचवटी विभागीय कार्यालयात शुक्रवारी दिवसभरात सुमारे ७८ लाख रुपये घरपट्टी व पाणीपट्टी कर जमा झाला आहे.
जुन्या पाचशे व एक हजार रु पये दराच्या नोटा महापालिकेत कर म्हणून भरता येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केल्याने नागरिकांची कर जमा करण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात मोठी गर्दी होते आहे.
दुसरा शनिवार असला तरी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी थकीत कर जमा करण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. आज रविवार सुटीचा दिवस असला तरी व त्यातच सोमवार पर्यंत जुन्या पाचशे व एक हजार रुपये दराच्या नोटा महापालिकेत स्वीकारल्या जाणार असल्याने नागरिकांनी मनपाचा थकीत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन पंचवटी विभागीय अधिकारी अशोक वाघ यांनी केले आहे.
इतरवेळी मनपाचा थकीत कर जमा करण्यासाठी मनपाला थकबाकीदारांना सूचना देत फिरावे लागायचे मात्र शासनाने पाचशे, हजार रुपये दराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने भीतिपोटी का होईना नागरिक महापालिकेत थकीत कर भरण्यासाठी गर्दी करत आहेत. (वार्ताहर)