८४ जागांसाठी ७८० नामांकन अर्ज दाखल

By Admin | Updated: May 6, 2017 23:02 IST2017-05-06T23:02:29+5:302017-05-06T23:02:41+5:30

ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

780 nomination forms for 84 seats | ८४ जागांसाठी ७८० नामांकन अर्ज दाखल

८४ जागांसाठी ७८० नामांकन अर्ज दाखल

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक नामांकन अर्ज शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक १, २, ८, ९, १०, ११ मधुन दाखल झाले आहेत.
महानगरपालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी होत आहे. गेल्या २९ एप्रिल पासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती; मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल करण्यास विलंब केला होता. आज शनिवारी अखेरच्या दिवशी ४४४ विक्रमी नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत ३३६ नामांकन अर्ज दाखल झाले होते. ८४ जागांसाठी एकूण ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ कर्यालयात शनिवारी दिवसभरात ९८ तर एकूण १७१ अर्ज दाखल झाले आहेत. कार्यालय-२ मध्ये दिवसभरात ८२ तर एकूण १७४ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. कार्यालय क्रमांक- ३ मध्ये ४८ असे एकूण ७९, कार्यालय क्रमांक- ४ मध्ये ५६ एकूण १०१, कार्यालय क्रमांक- ५ मध्ये ५८ एकूण ८२, कार्यालय क्रमांक - ६ मध्ये ४८ एकूण ९१, कार्यालय क्रमांक- ७ मध्ये ५४ एकूण ८२ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज पश्चिम भागातील १, २, ९, ८, १०, ११ मध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी दिवसभरात भाजपाकडून सुनील गायकवाड, मदन गायकवाड, रेखा चौधरी, सुवर्णा शेलार, ताराबाई शिरसाठ, विजया पवार तर सेनेकडून अ‍ॅड. संजय दुसाने, जिजाबाई पवार आदींसह मातब्बरांनी नामांकन अर्ज दाखल केले.

Web Title: 780 nomination forms for 84 seats