शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

७७ हजारांचे ४१ टायर चोरट्यांनी हातोहात केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:58 IST

चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला.

ठळक मुद्देकमी दरात किराणा देण्याच्या आमीषापोटी २ लाखांना गंडा४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना

नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत गीतांजली अपार्टमेंटमध्ये असलेल्या मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुकानाच्या गाळ्यात विक्रीसाठी १२ हजार रुपये किमतीचे ‘जेके मिचल’ कंपनीचे १२ हजार रुपये किमतीचे १५ नग, ६५ हजार रुपयांचे गुडइयर, योकोहम, ब्रीजीयेन कंपनीचे २६ टायर असे एकूण ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची फिर्याद राजेंद्र जगदीश मालविया (५८) यांनी मुंबईनाका पोलिसांकडे केली आहे. चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.-----कमी दरात किराणा देण्याच्या आमीषापोटी २ लाखांना गंडानाशिक : कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा.शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ जानेवारी २०१८ ते १३ जुलै २०१९ या कालावधीमध्ये संशयित सोनम अनिल चौथे, अनिल रामचंद्र चौथे, प्रेम अनिल चौथे (रा. तळेनगर, रामवाडी) यांनी एखंडे यांच्यासह अन्य महिलांची भेट घेतली. त्यांना कमी दरात किराणा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत अन्नपूर्णा महिला को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था स्वत:ची असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच त्यांचे ब्युटि पार्लर गाठून नातवाच्या शस्त्रक्रियेचे भावनिक कारण पुढे करून संशयित चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांकडून पैसे उकळून सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केली. किराणा माल विक्री करण्याच्या उद्देशाने या भामट्या जोडीने महिलांकडून पैसे उकळल्याचे फिर्यादित म्हटले आहे.आर्थिक फसवणुकीचे विविध फंडे समोर येत असून, शहरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया ते स्मार्ट डिजिटल बॅँकिंगप्रणालीचा गैरवापर करत अनेकांना चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर किराणा माल कमी दरात पोहचविण्याचे सांगून तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घालण्याचा नवीनच प्रकार पंचवटीत घडला. गुन्हेगार आर्थिक फसवणुकीसाठी विविध प्रकारचे फंडे वापरत असल्याने पोलिसांपुढे आर्थिक गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. एखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक साखरे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी