शहरात ७७ टक्के पोलिओ लसीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:26+5:302021-02-05T05:45:26+5:30

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाच्या शहरातील कार्यक्रमाचे उद‌्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते नाशिकरोडच्या खोले मळा ...

77% polio vaccination in the city! | शहरात ७७ टक्के पोलिओ लसीकरण !

शहरात ७७ टक्के पोलिओ लसीकरण !

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाच्या शहरातील कार्यक्रमाचे उद‌्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते नाशिकरोडच्या खोले मळा शहरी आरोग्य केंद्रात करण्यात आले. रविवारी दिवसभर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात जिल्ह्याच्या तुलनेत कमी सुमारे ७७ टक्केच पोलिओ लसीकरणाचे ध्येय गाठणे शक्य झाले.

पोलिओ लसीकरणाबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली असूनही उद्दिष्टाच्या तुलनेत बरेच कमी लसीकरण झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. नाशिक शहरातील मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित लाभार्थी संख्या १ लाख ९३ हजार ४३८ असताना त्यापैकी १ लाख ४९हजार ५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. ही संख्या अपेक्षेपेक्षा तब्बल ४३ हजारांनी कमी असल्याने शहरात पुढील टप्प्यात लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग द्यावा लागणार आहे. महापौरांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील तसेच सूर्यकांत लवटे, कोमल मेहरोलिया, रमेश धोंगडे, ज्योती खर्जुल तसेच वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी मेनकर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके,डॉ. जितेंद्र धनेश्वर ,डॉ शैलेश लोंढे तसेच जे डी सी बिटको रुग्णालयतील वैदयकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने हजर होते . अन्य बालकांना दिनांक १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान घरोघरी जाऊन कर्मचारी पोलिओ लस देतील. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव अतिरिक्त आयुक्त डॉ . प्रवीण अष्टीकर, तसेच वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

इन्फो

शहरातील केंद्रांवरील संख्या

सातपूरच्या शहरी आरोग्य सेवा केंद्रात ३७१९ , संजीवनगर ४८७४, आर.सी.एच. केंद्र गंगापूर ७२९०, एम.एच.बी. कॉलनी ५७६५, सिडको ४८०८ , अंबड ५०४५, मोरवाडी ५०६८, कामटवाडे ४७८१, पवननगर ५६८५ पिंपळगांवखांब ६९३९ नाशिकरोड ४३५९ विहींतगाव ४४१३ सिन्नरफाटा ४२३६ गोरेवाडी ३१९५ दसकपंचक ५४११ उपनगर ५०१० संगम ५५०५ बजरंगवाडी ४१५९ भारतनगर ५१५३ वडाळागाव ५१४१ जिजामाता ३७०७ मुलतानपुरा ४९२४ शासकीय रुग्णालय ८८७५ रामवाडी २५९२ रेडक्राॅस ३२६० मायको पंचवटी ४१७४ म्हसरूळ ६१२६ मखमलाबाद ५०९१ तपोवन ४८७९ हिरावाडी ४८२१.

कोट

महानगरपालिका क्षेत्रात पल्स पोलिओचे डोस नंतरदेखील नागरिकांना दिले जातात, हे बहुतांश नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात कमीच प्रतिसाद असतो. मात्र, १ फेब्रुवारीपासून मनपा कर्मचारी घरोघरी जाऊन पोलीस लसीकरण करणार आहेत.

डाॅ.बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी

Web Title: 77% polio vaccination in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.