सायखेडा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सायखेडा येथे आयोजित केलेल्या निर्धार परिवर्तनाचा या मेळाव्यासाठी आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतचे संचालक असलेले गोकुळ बबनराव गीते यांचे ७६ हजार रूपये रोख चोरी गेले असून त्यात सर्वच्या सर्व दोन हजार रु पयांच्या ३८ नोटा अज्ञात चोरट्याने खिसा कापून काढून घेतल्या. या संदर्भात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, कार्यक्रमाचे गेट ते व्यासपीठ या दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिरवणूक काढण्यात येणार होती. सदर मिरवणुकीसाठी महिंद्रा कंपनीची जिप सजविण्यात आली होती. अजित पवार जीपमध्ये बसतील म्हणून जिल्हा परिषदेजवळ गर्दी होती. त्या गर्दीजवळ गीते यांचे टायर विक्र ीचे दुकान असल्याने ते तिथे उभे राहिले होते. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने हात सफाईने खिसा कापून ७६ हजार रु पये चोरले अशी माहिती गोकुळ गीते यांनी सायखेडा पोलिस स्टेशनला दिली आहे. सायखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.गेला असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सायखेड्याच्या सभेत ७६ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:11 IST