जिल्हा परिषदेचे ७५ कोटी अडकले
By Admin | Updated: April 18, 2017 01:34 IST2017-04-18T01:34:32+5:302017-04-18T01:34:44+5:30
जिल्हा बॅँकेला तंबी : शिखर बॅँकेकडे लक्ष

जिल्हा परिषदेचे ७५ कोटी अडकले
पेठ : राज्य शासनाने यावर्षी शिक्षकांच्या बदल्या करताना अवघड व सोपे क्षेत्र अशी वर्गवारी करून शाळांची यादी जाहीर केली असून, यामध्ये पेठ तालुक्यातील केवळ ७१ शाळा अवघड क्षेत्रात दाखवल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांनी आज पंचायत समिती अधिकारी व पदाधिकाऱ्यांना घेराव घातला.पेठ तालुका तसा संपूर्ण आदिवासी व डोंगराळ भाग असतानाही बहुतांश शाळा सोप्या क्षेत्रात दाखवण्यात आल्या आहेत. केवळ रस्ते आहेत म्हणून सोपे अशी सोयीस्कर व्याख्या करून तालुकास्तरावरून चुकीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आल्याने संतप्त शिक्षकांनी पंचायत समिती गाठली.
उपसभापती तुळशिराम वाघमारे, बाजार समिती संचालक शामराव गावीत, माजी सभापती अंबादास चौरे, नंदू गवळी यांची भेट घेऊन सदोष याद्यावर शिक्षकांनी आक्षेप घेतला. अतिदुर्गम अशा गैरसोयी असलेल्या गावांचा सोपे क्षेत्रात समावेश करण्यात आल्याने अशा शिक्षकांवर बदली प्रक्रि येत अन्याय होणार असून पेसा कायद्यातंर्गत संपूर्ण पेठ तालुका अवघड क्षेत्रात गणला जावा
या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर टोपले, रामदास शिंदे, राजेंद्र भोये, अनिल सांगळे, दिपक बागूल, लक्ष्मण गावीत, प्रविण गायकवाड, रमेश वाघ,यशवंत खंबाईत, सचिन इंगळे, संतोष चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शिक्षक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. ( वार्ताहर )