शिबिरात ७३ जणांचे रक्तदान
By Admin | Updated: November 6, 2014 00:23 IST2014-11-05T23:21:44+5:302014-11-06T00:23:53+5:30
शिबिरात ७३ जणांचे रक्तदान

शिबिरात ७३ जणांचे रक्तदान
येवला : तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील सानेगुरूजी सार्वजनिक वाचनालय, ग्रामविकास मंडळ, धन्वंतरी कृषी विज्ञान मंडळ, ओम साईराम बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात ७३ जणांनी रक्तदान केले.
उद्घाटन अॅड. समीर देशमुख, पोपट पवार, तात्याबा मढवई यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या साथीच्या आजाराचे रु ग्ण वाढले असून परिणामी रक्ताची मागणी वाढली आहे. यामुळे रक्तदान जीव वाचिवण्यास मदत करणार आहे असे समीर देशमुख यांनी सांगितले. शिवाजी निमसे, ज्ञानेश्वर चव्हाण, बाबासाहेब शिंदे, प्रमोद पाटील, दत्तू पवार, रावसाहेब खरोटे, सुकदेव मढवई, भाऊसाहेब रोकडे, मिलिंद गुंजाळ, विजय सोनवणे, प्रवीण राजगुरू, सुरेश खरोटे, छबू भाकरे शरद घोटेकर, रंगनाथ लभडे, संतोष शहा आदि ७३ जणांनी रक्तदान केले. (वार्ताहर)